प्रफुल्ल पटेलांना ‘मिर्ची’ गोड, मनसेचे पुन्हा धर-सोड, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. यावेळी माघार घेतो, पण वारंवार चालणार नाही; फडणवीसांच्या विनंतीस मान, विधानपरिषद निवडणूक न लढवण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय, इथे वाचा सविस्तर बातमी

२. अडचणीत राष्ट्रवादी, पण प्रफुल्ल पटेल यांची धाकधूक संपली; दादांच्या कार्याध्यक्षांना १८० कोटींचा दिलासा

३. ४२ जागांची जबाबदारी माझी, पण कृपाल तुमानेंना तिकीट द्याल तर ४१ चीच, बावनकुळेंनी अमित शाहांना अट घातली होती, तुमानेंचा दावा

४. मुस्लिम समाजाचे मत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला; कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा

५. ना बिनशर्त पाठिंबा, ना प्रचारसभा; स्वत:ला भोपळा, पण उत्तर प्रदेशात बसपने वाचवल्या भाजपच्या १४ जागा

६. संघाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांशी नागपुरात भेट, फडणवीस दिल्लीला; संघाची ‘गरज नसणाऱ्या’ जे पी नड्डांसाठी संदेश?

७. मान्सूनचे दक्षिण महाराष्ट्रात आगमन; पुढील ३-४ दिवसांत उर्वरित राज्यात होणार दाखल, हवामान विभागाचा अंदाज काय? इथे वाचा सविस्तर बातमी

८. आरबीआयचे नवीन पतधोरण जाहीर, रेपो दर जैसे थे, मुख्य व्याजदर ६.५ टक्क्यांवर स्थिर

९. बहीण पाण्यात उतरली, भावाचा घरी व्हिडिओ कॉल, मात्र काही वेळातच अनर्थ घडला, जळगावच्या भावंडांचा रशियात मृत्यू

१०. टी२० विश्वचषकात अमेरिकेकडून खेळणाऱ्या मुंबईकर सौरभ नेत्रावळकरकडून सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा ‘खेळ’, इथे वाचा सविस्तर बातमी