पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात आता आखणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेंसह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.या आपघातातील आरोपी अल्पवयीन हा मद्यप्राशन करुन पोर्शे गाडी भरधाव वेगाने चालवत होता आणि त्याने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुणांना आपल्या कारने चिरडल्याचा आरोप आहे. त्याला अटक केल्याच्या ८ तासांनी त्याची ब्लड टेस्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये त्याने मद्यप्राशन केलं नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, पोलिसांनी जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि बारच्या बिलमधून त्याने मद्यप्राशन केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.
आता या प्रकरणात ससूनच्या दोन डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या डॉक्टरांला अटक करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात ससूनच्या दोन डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या डॉक्टरांला अटक करण्यात आली आहे.
ससूनच्या या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे. डॉ. अजय तावरे हे ससून रुग्णालयाचे मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्यासोबत डॉ. श्रीहरी हरलोर यांचीही पोलिस चौकशी करत आहेत. या दोघांनाही दुपारी शिवाजी कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.