पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन आहे. अपघातानंतर त्याला अवघ्या १५ तासांमध्ये जामीन मिळाला. बालहक्क मंडळाच्या निर्णयाविरोधात पोलिसांनी भूमिका घेतली. त्यानंतर आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. आरोपीला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यातील तरुणाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. १ दिन मे मिल गयी मुझे बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल, अशा आशयाचं रॅप साँग तरुणानं अपलोड केलं होतं. या तरुणाची माहिती आता उघडकीस आली आहे.
पुण्यातील अपघातानंतर अतिशय असंवेदनशील रॅप साँग तयार करणाऱ्या, ते व्हायरल करणाऱ्या तरुणानं आता इन्स्टावर नवी स्टोरी अपलोड केली आहे. त्यातून त्यानं वृत्तवाहिन्या आणि माध्यमांनी लक्ष्य केलं. आपली ओळख उघड केल्याबद्दल त्यानं शिवीगाळ केली आहे. त्यानं इन्स्टा स्टोरीवर पुन्हा एकदा रॅप साँग अपलोड केलं आहे. विशेष म्हणजे हा तरुण आपणच तो आरोपी मुलगा असल्याचा दावा करत आहे. इन्स्टाग्रामवर या तरुणाचं युझरनेम @cringistaan2 असं आहे. त्याच्या पेजवर नजर टाकल्यास अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ दिसतात.
आर्यन देव नीखरा असं तरुणाचं नाव आहे. २३ मे रोजी त्यानं पुणे पोर्शे अपघातावर रॅप साँग अपलोड केलं होतं. कारखाली चिरडून दोघांचा जीव घेणारा आरोपी वेदांत अगरवाल आपणच असल्याचा दावा त्यानं केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. जामीन मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या तरुणाला पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

अनेक माध्यमांनी रॅप साँग करणारा तरुणच तो अल्पवयीन आरोपी असल्याचं वृत्त दिलं. पण काही वेळातच याबद्दलची खरी माहिती समोर आली. व्हायरल झालेला मुलगा आणि आरोपी मुलगा वेगळा असल्याचं स्पष्ट झालं. तरुणानं रॅप साँगमध्ये वापरलेले शब्द अतिशय आक्षेपार्ह होते. ‘करके बैठा मै नशे इन माय पोर्से, सामने आया कपल अब वो है नीचे, साऊंड सो क्लीशे, सॉरी गाडी चढ गयी आप पे. सतरा की उमर पैसे खूब मेरे बाप पे, १ दिन मे मिल गयी मुझे बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,’ अशा ओळी रॅप साँगमध्ये होत्या.