पोर्शे अपघातातील आरोपी विशाल अगरवालच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल याच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे. २००७ साली हिंजवडी परिसरात बांधलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकारणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आग्रवाल याच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळत आहे.मिळालेल्या माहितीवनुसार, या प्रकरणी विशाल अडसूळ यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी विशाल सुरेंद्र कुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल(बंधू), विनोद कुमार अगरवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्याविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभेची पहिली टर्म, काल मंत्रिपदाची शपथ अन् आज भाजपचा मंत्री म्हणतोय, मला मोकळं करा! पण का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात २००७ साली बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ.सोसायटीमध्ये ७१ जणांनी फ्लॅट घेतला होता. या सोसायटीच्या मालकीची तिथे पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, रिकामी जागा आहे. मात्र, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून त्या नकाशात फेरबदल करून केली. तसेच याबाबत नॅन्सी ब्रम्हा सोसायटी सभासदांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे बिल्डर विशाल अगरवाल यांच्या साथीदारांनी संगनमत करून सोसायटीच्या जागेवर ११ मजली इमारतीत ६६ कमर्शियल ऑफिस बांधले आणि १० मजली इमारतीत २७ सदनिका आणि १८ शॉप्स बांधून नॅन्सी ब्रम्हा को.ऑप.हौ. सो.ली सोसायटी धारकांची फसवणूक केल्याचे समोर आले.