बाळासाहेब थोरात म्हणाले..
स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीसारखे प्रकरण दिसतायत, यामध्ये मोठा कोट्यावधींचा भष्ट्राचार होतोय याचा परिणाम असा की काही विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांचे नुकसान होते, राज्य नव्हे तर देश पातळीवर सुद्धा पेपरफुटीचे षडयंत्र सुरु झाले आहे. आता नवीन कायदे लागू झालेत आजपासून कडक कारवाई करा पेपरफुटीतील गुन्हेगाराला कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा करा. उच्चपदस्थ अधिकारी असला तरी त्याचावर कडक करावाई करा अशी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची विधानसभेत मागणी.
भास्कर जाधव काय म्हणाले
पेपरफुटीच्या मुद्द् मुद्द्यावरुन भास्कर जाधवांनी थेट सभागृहात फोन काढत कोणत्या परीक्षाबाबत पेपर फुटीच्या बातम्या आल्या आहेत त्या परीक्षांची नावे जाहीर केली. तसेच राजस्थानमध्ये अशाच प्रकार पेपरफुटीचे जाळे पसरले होते. तसेच जाळे राज्यात पसरले का? यांचा तपास सरकारने करावा असे भास्कर जाधव म्हणाले इतकरेत नव्हे तर कडक कायदा राज्यात लागू करा अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
पेपरफुटी बोलणे चुकीचे आहे एक लाख विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळत असतील तर पेपर फुटी बोलणे चुकीचे आहे. पेपरफुटी बोलून विरोधक चुकीचा नॅरेटीव्ह सेट करताय असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला. राज्यात सुद्धा पेपरफुटी कायदा अंमलात आण्याचा असे मागच्या विधानसभेत ठरले, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे पेपरफुटीचा कायदा होणार आहे आणि याच अधिवेशनात आता आम्ही कायदा आणणार आहोत. तलाठी भरतीत पेपर फुटला नाही उत्तर चुकले म्हणून परीक्षा रद्द केली होती फडणवीसांची सभागृहात माहिती दिली. तर ‘गट क’ च्या जागांची परीक्षा एमपीएमसी मार्फत घेण्यात येईल अशी सुद्धा माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली.