कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचितगड या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच नाहीत नाही
कोल्हापूरमध्ये पुरोगामी विचारांचा खासदार निवडून आल्याने भाजपसारख्या जातीयवादी पक्षाच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा दुर्देवी घटना घडविल्या जात आहेत, असा गंभीर आरोप करून विशाळगड येथे आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करणारे शिवप्रेमी असूच शकत नाहीत. त्यामुळे हे हल्लेखोर कोण होते याचा सरकारने तपास केला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
रवी पडवळ याला सरकार का पकडत नाही?
राज्यातील कायदे सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत हे दुर्दैव आहे. विशाळगड येथे तोडफोड होत असताना पोलीसांचे हात कोणी बांधले होते याचा सरकारने खुलासा केला पाहिजे. रवी पडवळ खुले आम व्हिडीओवरून धमकी देतो पण त्याला सरकार का पकडत नाही, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारला.
सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता
अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने तेथील स्थानिकांशी संवाद करून सोडविला असता तर दुर्देवी घटना टाळता आली असती. परंतु सरकारला हा प्रश्न सोडवायचा नव्हता, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. तसेच यासंदर्भीतील चौकशीच्या मागणीचे पत्र वडेट्टीवार यांनी शासनाला दिले.