वातावरणातील घडामोडींमुळे राज्याच्या बहुतांश भागात आलेल्या उष्णतेची लाटेचा फटका पुण्यालाही बसला आहे. त्याचबरोबर राज्यात सोलापूर येथे सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात गेल्या आठवडाभरापासून वाढलेली उष्णता कमी होण्याऐवजी दररोज हंगामातील उच्चांक नोंदवला जात असल्याने पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसा उन्हाचा दाह, गरम वाऱ्याचा सामना करत आहेत. किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्यामुळे रात्रीचा उकाडाही वाढला आहे. येत्या पाच मेपर्यंत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढेच राहणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी सुट्टी असली, तरी सकाळी साडेदहा ते साडेचार या काळात बाहेर फिरणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
तळेगाव ढमढेरे ४४
शिरूर ४३.९
मगरपट्टा ४३
कोरेगाव पार्क ४२.७
लोहगाव ४२.५
चिंचवड ४१.९
एनडीए ४१.८
शिवाजीनगर ४१.७
आंबेगाव ४१.७
हवेली ४१
प्रमुख शहरांमधील तापमान
सोलापूर ४४.०
मालेगाव ४३.२
जळगाव ४३.०
अमरावती ४२.८
चंद्रपूर ४२.८
ब्रह्मपुरी ४२.२
नागपूर ४१.४
नगर ४१.०
छत्रपती संभाजीनगर ४०.८
मुंबई ३४.१