पुणे (शिरूर) : पुण्यातील पोर्श अपघाताची घटना ताजी असतानाच आता शिरूर तालुक्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून ढाब्यावरून उलट्या दिशेने येणाऱ्या चारचाकी गाडीने धडक दिल्याने एका निष्पाप तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.दिपक जालिंदर येठेकर (वय ३३. रा, गुंदेगाव) याचा मृत्यू झाला असून यातील चारचाकी चालक हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर चालक फरार झाला असून त्याने मद्यपान केले असल्याची माहिती देखील समोर येत आहे. कवठे यमाई येथे अष्टविनायक महामार्गावर एका धाब्याजवळ हा अपघात काल बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास झाला आहे. अमोल गोरक्ष येठेकर (वय ३४, व्यवसाय शेती, रा. मु. पो. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येमाई – पारगाव रस्त्यावर फिर्यादी यांचा चुलत भाऊ दिपक हा मोटार सायकल क्रं.एम.एच. १६. सी.आर. ७७८५ चालवत जेवणाचा डब्बा आणण्याकरता कामगार रंगनाथ बन्सी आढाव याच्यासह जात होता. कवठे येमाई बाजूने पारगावकडे राँग साईडने ढाब्यावरून येणाऱ्या इको गाडी क्रं. एम.एच.१२ टी.डी.८७१८ चालकाने भरधाव वेगाने येत असताना त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामधे दिपक येठेकर याचा मृत्यू झाला. यावेळी पाठीमागे बसलेला रंगनाथ आढाव हे गंभीर जखमी झाले आहेत.

चारचाकी गाडी चालवणारे तरुण हे एका मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असल्याने ढाब्यावर मद्य सेवन करत फार्महाऊसवर बसल्याची चर्चा परीसरात आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी मात्र एका गरीब मजुराच्या जीवावर बेतली आहे. घटनेनंतर गाडी चालक पसार झाला आहे. गाडीचा मालक कोण? चालक कोण? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेतील आरोपीला गजाआड करण्याची मागणी नागरीकाकडून केली जात आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.