पिंपरी : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून आठ वाजता टपाली मतदानाने मतमोजणीची सुरुवात झाली आहे.
पिंपरी विधानसभेत महायुतीचे अण्णा बनसोडे विरुद्ध महा विकास आघाडीचे सुलक्षणा शीलवत यांच्यात लढत होणार आहे. चिंचवड मतदार संघात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांच्या थेट लढत होणार आहे. तर भोसरी विधानसभेत महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांच्यात फाईट होत आहे.
तिनही विधानसभा मतदारसंघात आठ वाजता टपाली मतदानाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पिंपरी विधानसभेत 51.78 टक्के एवढे मतदान झाले आहे. चिंचवड मध्ये 58. 39% तर भोसरी विधानसभेत 61.54% एवढे मतदान झाले.