जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यनगरी दाखल होत आहेत. या पालखी सोहळ्यात दरवर्षी शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह संभाजी भिडे सामील होतात. यावर्षीही ते पालखीत सहभाग नोंदवणार आहेत.
संभाजी भिडे आणि त्यांच्या वारकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये तसेच दिंड्यांची शिस्त न मोडता पालखी सोहळ्याला विलंब होणार नाही याचीही त्यांनी काळजी घ्यावी. जर संभाजी भिडे वारकरी म्हणून सहभागी होत असतील तर काहीही हरकत नाही, असे पुणे पोलिसांनी सांगितलं आहे.
संभाजी भिडे यांनी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतले. थोड्याच वेळात ते पालखी सोहळ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसह वारीत सहभागी होतील.
दरम्यान याआधी माऊलींच्या पालखी मार्गात अडथळा आणल्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पुण्यातील गुडलक चौकात पालखी मार्गात वादावादी झालेली होती काही काही धारकर यांनी डोक्याला फेटे आणि हातात तलवारी घेऊन पालखीत सहभाग घेतला होता त्यावेळी मोठी वादावादी झाली होती हाच पूर्व अनुभव लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस दिलेली आहे.
नांदे तया घरी दैवत पंढरीचे या भावनेने पंढरीस निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरी रविवारी (३० जून) आगमन झाले. वारकऱ्यांच्या हातातील भगव्या पताका आणि टाळ-मृदंगाच्या गजराने पुण्यनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सेवा पुरविण्यात येत होत्या.