बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“अमोल मिटकरी कोण आहे? अजितदादांच्या बंगल्यावर एखादा ऑपरेटर आहे का? मला माहिती नाही, माहिती नाही तर विचारलं पाहिजे ना, की बाबा हे अमोल मिटकरी कोण आहेत? दादांच्या बंगल्यावर कुणाचा फोन आला, याचा रेकॉर्ड कोणाकडे असू शकतो? टेलिफोन ऑपरेटरकडे.. म्हणून मी म्हटलं.. मला माहिती नाही.. हे काही दिग्गज नाव नाही, की त्याने ट्वीट करावं आणि मी दखल घ्यावी… दखलपात्र माणसाची दखल घेतली जाते” असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी मिटकरींकडे दुर्लक्ष केलं. दादा मला संकटातून वाचवा, असं सांगत बजरंग सोनवणेंनी अजित पवारांना फोन केला होता, असा दावा मिटकरींनी केलेला.
“कोणीतरी माझा व्हिडिओ दाखवला, की हे यांच्या संपर्कात आहेत, ते इकडे येणार.. शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले आहेत. माझ्यासारखा एखादा जर कुणाच्या संपर्कात गेला, तर काय होईल? त्याला पब्लिक तर मारेलच… घरात माझे वडील मारतील, माझी बायको मला नाश्ता द्यायची नाही, उलट ज्यांचा एखादा खासदार आहे, त्यांना शरद पवारांच्या संपर्कात येता येईल. यांच्यावर काय बोलायचं” असं सोनवणे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
“कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे” असा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केला.