म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम विधीमंडळ सचिवालयातर्फे सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २ जुलैपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असून निवडणूक झाल्यास १२ जुलै रोजी निवडणूक घेतली जाईल, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव आणि निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी सोमवारी जाहीर केले. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे, उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश शरद शिंदे, अवर सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा सचिव तांबे यांच्याकडे २ जुलै २०२४ पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. विधीमंडळातील विधान भवनाच्या पहिल्या माळ्यावर कक्ष क्रमांक १२२मध्ये अर्ज सादर करता येणार आहे.
या अर्जांची छाननी ३ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता विधानभवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवाराला किंवा ती सूचना देण्याचे लेखी अधिकार उमेदवारांकडून देण्यात आलेल्या त्याच्या कोणत्याही सूचकामार्फत किंवा त्यांच्या निवडणूक एजंटला या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या कार्यालयात ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. त्याचप्रमाणे, निवडणूक लढविली गेल्यास १२ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले आहे.

मतदान केंद्रासंदर्भात हेल्पलाइन
येत्या २६ जून रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निडणूक आयोगाने महत्त्वाची घोषणा सोमवारी केली. यानुसार या मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारास मतदार यादी संदर्भात तसेच मतदान केंद्रासंदर्भात माहिती देण्यासाठी ttps://gterollregistration.mahait.org/GTRoll/Search ही लिंक तसेच ०२२ ६९४०३३९८ आणि ०२२ ६९४०३३९६ हे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.