प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे, मावळ : राज्यभरातून मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी शनिवार आणि रविवारी अनेक पर्यटक येत असतात. त्यातच पवना धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. याच पवना धरणात एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा, पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या परदेशातील मित्रांसोबत हा तरुण पवना डॅमवर पर्यटनासाठी आला होता. मात्र दुर्दैवाने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.
सागर कैलास साठे (वय २८ वर्ष, रा. देहूरोड, ता. मावळ, जि. पुणे) असं धरणात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेमध्ये टेन्ट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर साठे हा त्याचे प्रदेशातील मित्र स्टीफन जॉन, स्वप्नील कुमार गायकवाड आणि गिदुथुरी रोनाल्ड वन (सिडनी) यांच्यासोबत शनिवारी रात्री पवना धरण परिसरामध्ये असलेल्या कॅम्पिंगवर मुक्कामी आले होते. रविवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ते सर्वजण पवना धरणाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. पाण्यात पोहत असताना सागरला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो धरणात बुडू लागला. तो बुडत असताना पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर सागरला, सागरचे मित्र आणि मिल्ट्री कॅम्पमधील नवनाथ करंजुले यांनी त्याला पाण्याबाहेर काढलं. सीपीआर दिला आणि ग्रामीण रुग्णालय काले-कॉलनी इथे नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
याप्रकरणी टेन्ट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

दरम्यान, मावळ तालुक्यामधील पर्यटन फुलू लागलं आहे. त्यामुळे अनेक पर्यटक येथे वर्षा सहलीसाठी येतात. पवना डॅमवरही या काळात पर्यटक येतात. मात्र मोह आवरत नसल्याने पाण्यामध्ये उतरतात आणि आपला जीव गमावून बसतात. प्रशासनाकडून अनेकदा अशा अति उत्साही पर्यटकांना सूचना देखील दिल्या जातात. मात्र, ते या सूचनांना केराची टोपली दाखवून उत्साहात पाण्यात उतरतात. अशा या पर्यटकांमुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.