पुणे: पुणे विमानतळाची धावपट्टी आणि परिसरात शुक्रवारी सकाळी पक्षांच्या थव्यांच्या असामान्य हालचालीमुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी एका तासासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातून सुटणाऱ्या सहा विमानांना उशीर झाला. तर, पुण्यात येणारी तीन विमाने वेगवेगळ्या ठिकाणी वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर सकाळी ११ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात स्थालांतरीत पक्षाचे थवे दिसून आले. या पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक बसून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’कडून पुणे विमानतळाची धावपट्टी सकाळी ११ ते ११ वाजून ५० मिनिटे बंद करण्यात आली. या दरम्यान पक्ष्यांना हटविण्यासाठी फटाक्यांचे आवाज करण्यात आले. धावपट्टीवरून पक्षी गेल्याची खात्री झाल्यानंतरच धावपट्टी सुरू करण्यात आली आहे.मात्र, या काळात प्रवासी सेवाला मोठा फटका बसला. पुण्यातून उड्डाण करणाऱ्या सहा विमानांना उशीर झाला. तर, पुण्यात येणारी तीन विमाने दुसरीकडे वळविण्यात आली. पुण्यातून दिल्लीला सकाळी सव्वा अकरा वाजता सुटणारे विमानाचे उड्डाण उशीराने करण्यात आले. पुण्यातून उशीर झालेल्या सहा विमानांपैकी चार विमाने ही दिल्लीला जाणारी होती. तर, एक गोव्याला जाणारे आणि दुसरे चेन्नईला जाणारे होते. या विमानांना दोन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.

तीन विमाने वळविली
पुण्यात येणारे मुंबई-पुणे हे विमान पुण्यात पोहोचले होते. ते पुण्यात १० वाजून ५० मिनिटांनी उतरणार होते. पण, विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात पक्षी असल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानाने परिसरात घिरट्या घातल्या. पण, त्या विमानाला उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ते विमान पुन्हा मुंबईकडे वळिवण्यात आले. तर, दिल्लीहून पुण्यात आलेले विमान देखील मुंबईला वळवण्यात आले. तर, चेन्नईहून पुण्याला निघालेले एक विमान हैदराबात येथे वळविण्यात आले. धावपट्टीवर अचानक आलेल्या पक्षांमुळे प्रशासनाची चांगलीच दमछाक केली. तसेच, त्याचा प्रवाशांना देखील मोठा फटका बसला.