पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना अमानुष मारहाण; तिघे गंभीर जखमी, घटनेनं खळबळ

सांगली: राज्यात सर्वत्र आषाढी एकादशी जल्लोषात पार पडली. वारीसाठी पंढपूरला गेलेले वारकरी आता घरी परतत आहेत. अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनं खळबळ उडाली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.
पुन्हा हिट अँड रन! भरधाव कारनं ५ महिलांसह २ चिमुरड्यांना उडवलं, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या गावातील वारकरी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेले होते. यानंतर ते नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावकडे जात असताना रस्ता चुकल्याने ते सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या गावात गेले. या ठिकाणी अरुंद रस्त्यावरून ट्रक नेत असताना एका कारचालकासोबत वारकऱ्यांचा वाद झाला. यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी आणि एका सराईत गुन्हेगाराने बेळगावमधील वारकऱ्यांचा ट्रक अडवला. त्यानंतर वारकऱ्यांना कुऱ्हाडीचा दांडा आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुरेश खेमनना राजूकर, परशुराम खाचो जाधव आणि ट्रक चालक असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी परशुराम जाधव हे बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. वारकऱ्यांना मारहाण केल्यानंतर मालगावमधील संबंधित ग्रामस्थांनी घटनास्थळावरून पलायन केले. वारकऱ्यांना झालेल्या मारहाणीबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करीत आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांना अनुदान देण्याऐवजी महाराष्ट्रात वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी, असे मत वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी असे मत बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या गावातील वारकऱ्यांनी व्यक्त केले.

वारकऱ्यांचा ट्रेम्पो दरीत कोसळला

दरम्यान वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर निघालेले २५ वारकरी सहकुटुंब सिंहगडावर पर्यटनासाठी आले होते. यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही होते. यातील काही वारकरी डोणजे गोळेवाडी भागातील होते. घाटातून खाली येताना अकरा हजार पॉइंटजवळ वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. काही कळण्यापूर्वीच ट्रेम्पो दरीच्या दिशेने कोसळला.