बॉलीवुडचा चित्रपट धूम हा तुम्ही बघितला असेल. ज्यात दुचाकी चोरांची टोळी शिताफीने मोठ-मोठ्या चोरी करत असतात. यात चोरांची टोळी आपल्या हुशारीने लूटलेले सामान घेऊन पोलिसांच्या हातवर तुरी देऊन पसार होतात. चित्रपटात जगभरातील खतरनाक बाइक स्टंट आहेत. पण खऱ्या जीवनातही अशी एका चोरीची घटना समोर आली आहे. ज्यात चोरांनी आपला जीव धोक्यात टाकून स्टंट करत चोरी केल्याचे दिसत आहे.
आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील चोरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोटरसाइकलवरील तीन तरुणांपैकी दोन तरुण ट्रकवर चढत त्याची ताडपत्री कापत सामानांनी भरलेला एक बॉक्स खाली फेकताना दिसत आहेत. त्यांचा एक साथीदार ट्रकच्या पाठीमागे त्याच स्पीडने मोटर सायकलवर पाठलाग करताना दिसत आहे. बॉक्स खाली फेकल्यानंतर ट्रकवरील ते दोघे चोर एक-लएक करुन ट्रकच्या मागून उतरून सुरू असलेल्या मोटर सायकलवर बसतात. हे इतके भीतीदायक आहे की यात कोणाचाही तोल गेला असता तर त्यांना जीव गमावावा लागला असता.
ट्रकच्या मागे एक कारचालक होता. त्याने या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला. शाजापूर जिल्ह्यात मक्सी ते शाजापूर दरम्यान दिवसाढवळा अशा प्रकारच्या घटना रोज समोर येत आहेत.
ट्रक चालकांनी केला महामार्गावर गोंधळ
आग्रा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपूर्वी चोरांनी एका ट्रकमधून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे चोर पेटी घेऊन जाऊ शकले नाही. त्यानंतर ट्रक चालकांनी रस्ता अडवत मोठा गोंधळ घातला. लालघाटी पोलिसांनी तिथे पोहचत मार्ग मोकळा केला.
मक्सी पोलिस स्टेशनचे अधिकारी प्रभारी भीम सिंह पटेल यांनी सांगितले की, ‘ ट्रकमधून चोरी करण्याच्या घटना वाढत आहेत. देवास आणि तराना येथे अशा घटनाचे प्रमाण अधिक आहे.’ पुढे ते म्हणाले, ‘ हालिया ट्रकमधील चोरीची घटना कोठे घडली याबद्दल मला काही अद्याप माहिती मिळाली नाही आहे. तसेच त्याचा व्हिडीओ अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेला नाही. कोणा वाहन चालकाने चोरीची कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. व्हिडीओ मिळाल्यावर आम्ही त्याचा तपास करुन योग्य ती कारवाई करु.’ असेही पटेल यांनी सांगितले.