पुणे: पिंपरी मधील शगुन चौकात वाहतुकीचे नियम करणाऱ्या महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला दोघांनी मारहाण करून पळ काढला. ही घटना रविवारी (१६ जून) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास घडली. मारहाण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल धम्मपाल गाडे (२२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह उमाकांत उर्फ महादू भगवान वाघमारे (२०) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सपकाळ या पिंपरी वाहतूक शाखेत नेमणुकीस आहेत.

रविवारी सायंकाळी त्या शगुन चौक येथे वाहतुकीचे नियमन करत होत्या. पिंपरी कॅम्प येथे सपकाळ यांनी विना परवाना वाहन चालविल्या प्रकरणी एका दुचाकीवर कारवाई केली. त्यावरून दुचाकी चालकाने सपकाळ यांच्याशी हुज्जत घालून बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर कारवाई केलेल्या मुलाचा मित्र उमाकांत वाघमारे याने सपकाळ यांच्या कानावर फटका मारला. त्यानंतर आरोपी पळून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.