दुकानासमोर गाडी लावली, धाड..धाड..धाड तिघांकडून गोळीबार, पुण्यात आईस्क्रीम दुकान मालकावर हल्ला

पुणे (सासवड) : पुण्यात दिवसेंदिवस गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एका आईस्क्रीम दुकानाच्या मालकावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आईस्क्रीम दुकानमालक गंभीर जखमी झाला आहे. आठ महिन्यांपूर्वीच्या वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांकडून प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल टिळेकर असं जखमी झालेले व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर पुण्यातील हडपसर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील सासवड येथे गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास तीन हल्लेखोर काळ्या गाडीतून आले. त्यांनी टिळेकर यांच्या दुकानासमोर गाडी लावून गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबारात एक गोळी टिळेकर यांच्या पोटात शिरली. त्यात टिळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या पोटातील गोळी काढण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
NCP News : अजितदादा गटातील मंत्र्याची लेकच वडिलांविरुद्ध रिंगणात? शरद पवार गटात पक्षप्रवेशाची चिन्हं

राहुल टिळेकरांनी हल्ला करणार्‍या व्यक्तीमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत नातेवाईकांकडून तक्रार दाखल करण्यात आली असून याबाबत तपास केला जात आहे. पुण्यामध्ये दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडताना पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे सासवड परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

IAS पूजा खेडकरांच्या आईला अटक

दरम्यान, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाड येथून अटक केली आहे. शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचप्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.

मनोरमा खेडकर यांना महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली असून सध्या स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर यांना पुण्यात आणल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल.