शिवसेनेला जागा राखली, यामिनी जाधव यांना उमेदवारी
दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा दोघांनी दावा केला होता. भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक तयारीच्या सूचना केल्या आहेत. मात्र, शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नसल्याने अखेर त्यांना ही जागा देण्यात आल्याचे समजते. शिवसेनेलाही जाधव यांच्याशिवाय तगडा उमेदवार मिळत नसल्याने त्यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
ठाण्यात कोण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबतही भाजप आणि शिवसेनेत निर्णय होताना दिसत नाही. ठाण्याची जागा शिवसेनेला सुटल्याची चर्चा असून, येथून मिनाक्षी शिंदे आणि नरेश म्हस्के यांचे नावे आघाडीवर आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत यामिनी जाधव?
- मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत.
- तसेच भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदारही आहेत
- शिवसेना फुटीत त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
- पती यशवंत जाधव यांच्यावरील आरोपामुळेच त्या शिंदे गटात गेल्याची टीका झाली