मुंबई: सोशल मीडियावर रुबी खान नावाच्या लिंक्डइन यूजरची पोस्ट व्हायरल होतेय. पेशानं एचआर असलेल्या रुबी यांना मुंबईतील ताज हॉटेलच्या परिसरात एक कुत्रा झोपलेला दिसला. त्यांनी त्या कुत्र्याचा फोटो एका पोस्टसोबत शेअर केला. ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी उद्योगपती रतन टाटांच्या भूतदयेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.
रुबी यांनी मुंबईतील हॉटेल ताजच्या परिसरात एका कुत्र्याला जमिनीवर झोपलेल्या स्थितीत पाहिलं. त्यांनी याबद्दल चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलेली माहिती अतिशय विस्मयकारक आहे. ‘हॉटेल ताजच्या परिसरात भटका कुत्रा झोपलेला पाहून कुतूहल वाटलं. म्हणून याबद्दल हॉटेल कर्मचाऱ्यांतडे चौकशी केली. तेव्हा समजलं तो कुत्रा जन्मापासूनच हॉटेलचा भाग आहे. रतन टाटांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जर असे प्राणी हॉटेल परिसरात प्रवेश करत असतील, तर त्यांच्याशी चांगलं वर्तन करायला हवं,’ असं रुबींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘ताज हॉटेलमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बड्या व्यक्ती येतात. पण इथे प्रत्येक जीवाला किंमत दिली जाते. हॉटेलचं प्रवेशद्वार महत्त्वाचं आहे आणि हा कुत्रा तिथे शांतपणे निजला आहे. कदाचित अनेक पाहुण्यांनी त्याला पाहिलं नसेल. पण तो या जागेचा मालक आहे,’ असं रुबी त्यांच्या लिंक्डइन पोस्टमध्ये पुढे म्हणतात. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
‘आपण अनेकदा पूर्वग्रह, मानसशास्त्रीय सुरक्षा आणि भावनिक सुरक्षिततेशी संबंधी बोलतो. इथे मी या सगळ्या सिद्धांतांवर काम होताना, ती प्रत्यक्षात अंमलात येताना पाहिली. ही घटना म्हणजे मेंदू आणि हृदय यांच्या संतुलनाचं उत्तम उदाहरण आहे. या हॉटेलमध्ये प्रवेश करताना बाकीचे विचार करतील याची चिंता करण्यात आलेली नाही,’ असं रुबी यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. रतन टाटांचं भटक्या कुत्र्यांसाठीच प्रेम जगजाहीर आहे. ते अनेकदा दिसूनही आलं आहे. ते खूपदा सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित पोस्ट शेअर करत असतात.