मुंबई: पोलीस नियंत्रणेला सोमवारी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. दुपारच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला. कॉलरने पोलिसांना सांगितले की, मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट केला आहे. पोलिसांनी, धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल आणि विमानतळावर झडती घेतली. परंतु तेथे काहीही संशयास्पद आढळले नाही.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, धमकीच्या कॉलवर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि पोलिसांनी ठिकाणांचा शोध घेतला. मात्र, काहीही संशयास्पद आढळले नाही. हा धमकीचा फोन उत्तर प्रदेशातून आला असून कॉल करणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान दिल्ली आणि चेन्नईसह अनेक शहरांमध्ये अशा अनेक बोगस बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॉम्बची भीती निर्माण झाली आहे. याशिवाय, दिल्ली-एनसीआर, गुजरात, जयपूर, उत्तर प्रदेश आणि बेंगळुरूमधील या अनेक शाळांना गेल्या काही आठवड्यांपासून ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, त्यामुळे भीतीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, सर्व धमक्या ‘फसव्या’ ठरल्या.

याआधी २३ मे रोजी दिल्ली विद्यापीठाच्या प्रतिष्ठित लेडी श्रीराम कॉलेज, हंसराज कॉलेज आणि रामजस कॉलेजसह डझनभराहून अधिक महाविद्यालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहे. परंतु कसून शोध घेतल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नाही. दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना ४.३८ वाजता LSR कॉलेजमध्ये बॉम्बच्या धमकीबद्दल प्रथम कॉल आला आणि दोन अग्निशमन दलांना सेवेत आणण्यात आले. त्यानंतर इतर महाविद्यालयांनीही अधिकाऱ्यांना फोन केला.