तरुण क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला, गोलंदाजी करताना अनर्थ; आयुष्याच्या खेळाचा सामना क्षणात हरला

पिंपरी : कुणाचं मरण कधी कुठे लिहिलेलं असेल याचा काही नेम नाही. त्यात आजच्या धावपळीच्या युगात या गोष्टी सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत. अशी एक मनाला चटका लावणारी घटना पिंपरी – चिंचवड शहरातून समोर आली आहे. एका ४० वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगवी परिसरातील पीडब्ल्युडी मैदानावर ही घटना घडली. मिलिंद भोंडवे (वय ४०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्यांच्या मृत्यूने सांगवी परिसरात शोककळा पसरली आहे.
Dombivli Blast: भीषण स्फोटानंतर अनेक बेपत्ता, मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टचा आधार
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड परिसरातील सांगवी येथील पीडब्ल्युडी मैदानात एका क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान गोलंदाजी करणाऱ्या तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. झटक्यानंतर तो तिथेच कोसळला. सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
प्रेम विवाह केल्याचा राग, घरात घुसून आई आणि भावाकडून तरुणीची निर्घृण हत्या; तीन वर्षांनी अखेर न्याय
मिलिंद हा भोंडवे हा मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे वास्तव्य करत होता. मिलिंद भोंडवे हा तरुण शेतकरी कुटुंबातील तरुण होता. आई, वडील, दोन भाऊ, वहिनी, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. त्याला क्रिकेटची आवड असल्याने तो नेहमी क्रिकेट खेळत होता. या घटनेनंतर परिसरात तसेच क्रिकेट प्रेमी खेळाडूंमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

यावेळी सांगवी पोलीस उपनिरीक्षक आर. डब्ल्यू. गावंडे, पोलीस अंमलदार संतोष गवारी अधिक तपास करत होते. यावेळी सांगवी येथील औंध जिल्हा रुग्णालयात नेले असता शवविच्छेदन तपासणीत डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी १० वर्षाचा मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. अनेक तरुणांचा हृदयविकाराने निधन झाल्याचं प्रमाण वाढलं असून आतापर्यंत खेळाच्या मैदानावर तरुणांचा मृत्यू झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.