डॉ. तावरेची नियुक्ती हसन मुश्रीफांच्या शिफारसीने, ससूनच्या डीनकडून राजकीय हस्तक्षेप मान्य

पुणे : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच डॉ. अजय तावरे याची वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, अशी कबुली बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी बुधवारी दिली. डॉ. काळे यांच्यावर ठपका ठेवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने ‘ससून’मधील राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री ठोस भूमिका घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डॉ. तावरेला अधीक्षक करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. तर, तावरे प्राध्यापक असल्याने त्याची अधीक्षकपदी नियुक्ती करावी, असा शेरा मुश्रीफ यांनी टिंगरे यांच्या पत्रावर नोंदविला होता. त्यामुळे तावरेच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आल्याचे डॉ. काळे म्हणाले. मुश्रीफ यांच्या आदेशानुसार नियुक्ती दिल्याने तावरेला नियुक्ती देण्यात मी जबाबदार नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणात थेट राजकीय हस्तक्षेप झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. एवढेच नाही, तर डॉ. तावरेवर यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये आरोप झाले आहेत, याची कल्पना राज्य सरकारला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे पायउतार होणार? महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळण्याच्या चर्चा, शिवसेना म्हणते…
‘डॉ. तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिफाई अतुल घटकांबळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याविषयी बोलता येणार नाही. या प्रकरणाची मला कल्पना नव्हती. २७ मे रोजी अटक झाल्यानंतर मला याची माहिती मिळाली’, असे काळे म्हणाले.

‘मी सगळ्या विभागांवर लक्ष ठेवू शकत नाही’

ससून रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून वारंवार गैरप्रकार का घडत आहेत, असे प्रश्न विचारला असता, ‘माझ्या अंतर्गत ३० विभाग आहेत. प्रत्येक विभागात अनेक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असतात. प्रत्येकाकडे लक्ष देणे शक्य नाही. रुग्णालयात गैरप्रकार घडू नयेत, यासाठी काळजी घेण्यात येत असली, तरी प्रत्येक गोष्टीची माहिती अधिष्ठात्याला असणे शक्य नाही. मी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत काम करीत असतो, असे डॉ. काळे यांनी नमूद केले.
MNS vs BJP : महायुतीत महाभारत? विधानपरिषदेसाठी मनसे-दादांचे परस्पर उमेदवार, भाजपच्याच मतदारसंघात शड्डू
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

हे प्रश्न अनुत्तरितच…

– विविध प्रमाणपत्रांसाठी वेळ का लागतो?
– आकस्मिक मृत्यू प्रकरणातील शवविच्छेदन अहवालासाठी पैसे घेतले जातात का?
– आमदारांच्या पत्रावरून अधीक्षक केले जाते का?
– आकस्मिक मृत्यू अहवाल मोठ्या प्रमाणावर प्रलंबित का आहेत?
– गेल्या दीड वर्षात पाच अधीक्षक का बदलण्यात आले?