पोलिसांनी सुशांत आणि पंकज या आरोपींना अटक केली आहे. अमीरला जाळण्यासाठी डिझेल उपलब्ध करून दिल्याप्रकरणी सुनील चक्रनारायण (वय ३३, रा. चाकण) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अमीर शेख आणि निकिता गायकवाड यांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. या विवाहाला निकिताच्या घरच्यांचा विरोध होता. निकिता आणि अमीर मोशी येथे राहतात. अमीर एका कंपनीत काम करतो. १५ जून रोजी ‘अमीर कंपनीत कामाला जातो,’ असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र, तो पुन्हा घरीच न आल्याने निकिता उर्फ अरिना अमीर शेखने १६ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मुलगा घरी न आल्याने वडील महंमद शेख यांना निकिताच्या घरच्यांवर संशय आला. त्यांनी २७ जून रोजी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पंकजला नगर येथून अटक केली. १५ जून रोजी सुशांत आणि गणेश यांच्या मदतीने अमीरचा डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पंकजने चौकशीत दिली. पोलिसांनी पंकज आणि सुशांत यांना अटक केली; गणेशचा शोध सुरू आहे.
मुलीला पळवून नेऊन विवाह केल्याचा राग मुलीच्या घरच्यांना होता. या रागातून निकिताच्या दोन भावांनी आणि बहिणीच्या नवऱ्याने अमीर शेखचा खून केला. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, फरारी आरोपीचा शोध सुरू आहे.
– गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी एमआयडीसी