प्रतिनिधी, मुंबई : ज्या ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली त्या त्या वेळी जयंत पाटील यांनी ती मारुन नेली. सोमवारच्या वर्धापनदिनाच्या सभेतसुध्दा त्यांनी वेळ मारुन नेली. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण हे पद सोडू, असे पाटील यांनी जाहीर केले असून असेच सुरू राहिले तर अनेक दिवसांपासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पुढच्या वर्धापनदिनी अजित पवार यांच्यासारखा निर्णय घेतील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन अहमदनगर येथे सोमवारी पार पडला. यावेळी सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येत्या विधानसभा निवडणुकीनंतर आपण पद सोडणार, असे जाहीर केले. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. पाटील हे पद सोडण्याची वेळ आली की नेहमी वेळ मारुन नेतात, या खेपेलाही त्यांनी तेच केले आहे, अशी टीका त्यांनी केली.

चव्हाण म्हणाले की, मागच्या वर्षी पक्षाच्या वर्धापनदिनी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते सोडून पक्षाची जबाबदारी मागितली होती. परंतु त्यांना ती दिली नाही. अनेक लोकांची इच्छा आहे पण पाटील स्वतःचा गट वाढवण्याला महत्व देतात. एखाद्या नवीन चेहऱ्याला पक्षात संधी मिळावी. परंतु, ते होताना दिसत नाही, अनेक दिवसापासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापनदिनापर्यंत कंटाळून अजित पवार यांच्यासारखा निर्णय घेतील, असे भाकीतही चव्हाण यांनी वर्तवले.