मुंबई: ईशान्य मुंबईची जागा राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा उमेदवार बदलला आहे. २०१४ पासून दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपकडे आहे. विशेष म्हणजे २०१४ पासून भाजप इथून नवीन चेहऱ्यांना संधी देत आहे. यंदाही भाजपनं हाच ट्रेंड कायम ठेवला आणि विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकीट कापलं आणि मिहीर कोटेचा यांना संधी दिली. महाविकास आघाडीत ही जागा ठाकरेंकडे आहे. त्यांच्याकडून संजय दिना पाटील निवडणूक लढवत आहेत.
ईशान्य मुंबईतून एकूण ३४ उमेदवारांनी ४२ अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये मविआचे उमेदवार संजय पाटील यांच्या नावासारखे आणखी चार अर्ज आल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनीच हे अर्ज भरुन घेतल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ईशान्य मतदासंघात ४२ अर्ज आले. एकूण ३४ उमेदवार रिंगणात असून कोटेचा आणि पाटील यांनी प्रत्येकी तीन अर्ज भरले आहेत.
संजय पाटील यांच्या नामसाधर्म्य आणखी चार अर्ज दाखल झाले आहेत. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच कोटेचा यांनी स्वत: निवडणूक कार्यालयात थांबून डमी उमेदवार उभे केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. आम्हाला मिळत असलेलं नागरिकांचं प्रेम आणि पाठिंबा पाहून प्रतिस्पर्धी उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळेच डमी उमेदवार उभे केले जात आहेत. पण मतदारराजा हुशार आहे. तो आमच्या पाठिशी निश्चित उभा राहील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. संजय पाटील यांनी केलेले आरोप भाजप उमेदवार मिहीर कोटेचांनी फेटाळून लावले. ‘मी प्रचारात व्यग्र आहे. मला अशा अर्जांबद्दल कल्पना नाही. असे कितीही संजय पाटील उभे राहिले तरी मी त्यांच्यासमोर लढायला तयार आहे,’ असं कोटेचा म्हणाले.

ईशान्य मुंबईत ‘रायगड पॅटर्न’?
नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करुन विरोधी पक्षाच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याची खेळी रायगड लोकसभा मतदारसंघात अनेकदा पाहायला मिळाली आहे. २०१४ मध्ये याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनिल तटकरेंनी बसला. त्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल तटकरे असा सामना झाला. याच निवडणुकीत सुनिल तटकरे नावाचा एक अपक्ष उमेदवार होता. त्याला ९ हजार ८४९ मतं मिळाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तटकरेंचा २ हजार ११० मतांनी पराभव झाला होता.