गणेशोत्सवासाठी गावी जायचंय? तिकीट प्रतीक्षायादीत आहे? मग चिंता नको, कारण…

प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवासाठी चार महिन्यांआधी रेल्वे तिकीट आरक्षण करण्याचा प्रयत्न करताना प्रतीक्षायादीत तिकीट आलेल्या प्रवाशांसाठी शुभ वार्ता आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई-कोकण मार्गावर २०२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवार, २१ जुलैपासून प्रवाशांना विशेष मेल-एक्स्प्रेसचे आरक्षण करता येणार आहे. थांब्याबाबत सविस्तर माहितीसाठी मध्य-कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

सीएसएमटी-सावंतवाडी विशेष दररोज (३६ फेऱ्या)

कालावधी – १ ते १८ सप्टेंबर

  • ०११५१ सीएसएमटीवरून मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडीमध्ये दुपारी २.२० वाजता पोहोचेल.
  • ०११५२ सावंतवाडीवरून रोज दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि सीएसएमटीमध्ये दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.

सीएसएमटी-रत्नागिरी विशेष दररोज (३६ फेऱ्या)

कालावधी – १ ते १८ सप्टेंबर

  • ०११५३ सीएसएमटीहून सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१० वाजता रत्नागिरीत पोहोचेल.
  • ०११५४ रत्नागिरीहून पहाटे ४ वाजता सुटेल आणि सीएसएमटीत दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

Ganeshotsav 2024: मुंबईतील १५ उड्डाणपुलांचे पुन्हा सर्वेक्षण; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीचा निर्णय

एलटीटी-कुडाळ विशेष दररोज (३६ फेऱ्या)

कालावधी – १ ते १८ सप्टेंबर

  • ०११६७ एलटीटहून रोज रात्री ९ वाजता सुटेल आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहोचेल.
  • ०११६८ कुडाळवरून रोज दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.४० वाजता पोहोचेल.

एलटीटी-सावंतवाडी दररोज (३६ फेऱ्या)

कालावधी – १ ते १८ सप्टेंबर

  • ०११७१ एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
  • ०११७२ सावंतवाडीहून रात्री १०.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहोचेल.

Mumbai Metro 3 : पहिली अंडरग्राऊण्ड मुंबई मेट्रो पुढच्या आठवड्यात सुरु, तावडे म्हणतात हीच मोदी गॅरंटी

दिवा-चिपळूण मेमू दररोज (३६ फेऱ्या)

कालावधी – १ ते १८ सप्टेंबर

  • ०११५५ मेमू दिव्यातून सकाळी ७.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता चिपळूणला पोहोचेल.
  • ०११५६ मेमू चिपळूणवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि रात्री १०.५० वाजता दिव्याला पोहोचेल.

एलटीटी-कुडाळ विशेष (१६ फेऱ्या)

कालावधी – २ ते १८ सप्टेंबर (सोमवार, बुधवार, शनिवार)

  • ०११८५ एलटीटीहून मध्यरात्री १२.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता कुडाळला पोहोचेल.
  • ०११८६ कुडाळहून संध्याकाळी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता पोहोचेल.

एलटीटी-कुडाळ एसी विशेष (६ फेऱ्या)

कालावधी – ३ सप्टेंबर, १० सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर

  • ०११६५ एलटीटीहून मध्यरात्रीनंतर १२.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२.३० वाजता कुडाळला पोहोचेल
  • ०११६६ कुडाळवरून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ४.५० वाजता पोहोचेल