मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात १६ जणांचा मृत्यू झाला, तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी राजस्थानच्या उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून अटक केली. क्राईम ब्रांचकडून ३ दिवस भावेशचा शोध सुरु होता. या कालावधीत भिंडेनं अनेकदा त्याचा ठावठिकाणा बदलला. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान अशा ३ राज्यांमध्ये भिंडेचा शोध घेतला गेला.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. दंडाधिकारी न्यायालयानं भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेनं भिंडेच्या बँक खात्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या जाहिरातीच्या पैशांचा फायदा कोणाकोणाला होत होता, याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.
भावेश भिंडेला शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी भावेशच्या वकिलानं न्यायालयाला महत्त्वाची माहिती दिली. होर्डिंगचे वर्षाकाठी ४ कोटी रुपये रेल्वे पोलीस आयुक्तालयाला देत असल्याचं त्यांनी सांगितलं. इगो मीडियाच्या संचालकपदी जान्हवी म्हात्रे होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर २२ नोव्हेंबर २०२२ रोजी भिंडेची संचालकपदी नियुक्ती झाली.
घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी भावेशविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भावेश इगो कंपनीत किती वर्षांपासून कार्यरत होता? या परवानग्या कशा मिळवल्या? यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे? भावेशच्या जाहिरातीच्या व्यवसायातील पैसे कुठे जात होते? त्याला परवान्यांसाठी कोणी मदत केली? भावेशच्या व्यवसायाचे लाभार्थी कोण? या सगळ्या बाबींचा तपास सुरु आहे.

भावेश भिंडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच तो फरार झाला. त्यानं लोणावळा गाठलं. तेथील बंगल्यात तो काही तास लपून होता. तिथून तो अहमदाबादला गेला. एका नातेवाईकाकडे थांबला. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच भिंडेनं राजस्थानातील उदयपूर गाठलं. तिथे त्याच्या भाच्यानं रिसॉर्टमधील एक रुम बुक केली होती. भिंडेला इथूनच अटक करण्यात आली.