काँग्रेसमध्ये २ गट अन् नार्वेकरांसमोर संकट; ‘त्या’ यादीवर ठाकरेंना अविश्वास; बैठकीत काय घडलं?

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्यानं विरोधकांना धक्का बसला. पुरेसं संख्याबळ नसताना महायुतीचे सगळेच्या सगळे ९ उमेदवार विजयी झाले. तर मविआचे २ उमेदवार निवडून आले. शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीची १० मतं फुटली. त्यामुळे आता यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

ठाकरेसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली. ते विजयी झाले. उद्धवसेनेकडे १५ आणि अपक्ष १ अशी १६ मतं होती. ती मतं नार्वेकरांना मिळाली. आमच्या ७ आमदारांनी नार्वेकरांना मतदान केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. पण काँग्रेसची ७ नव्हे, ६ मतं नार्वेकरांना मिळाली. त्यामुळेच त्यांना २२ मतं पडली आणि ते दुसऱ्या फेरीत गेले, असा ठाकरेसेनेचा प्रतिदावा आहे.
MLC Election 2024: ठाकरेंकडून मविआ सोडण्याचा इशारा; पवारांचे अनेक कॉल, पण नो रिस्पॉन्स; MLC निवडणुकीआधी घमासान
काँग्रेसच्या विश्वासार्ह आमदारांची मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना बरीच मेहनत करावी लागली. काँग्रेसचे कोणते आमदार नार्वेकरांना मतदान करतील, याची एक यादी ठाकरेंना देण्यात आली. त्यात हिरामण खोसकर, सुलभा खोडके, कुणाल पाटील, शिरीष चौधरी यांच्या नावांचा समावेश होता. या आमदारांबद्दल ठाकरेंच्या मनात शंका होती. हे आमदार क्रॉस व्होटिंग करतील, अशी भीती ठाकरेंना वाटत होती.
MLC Election 2024: नार्वेकर जिंकले, पण ठाकरे व्हिलन ठरले; पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करुन शिंदेंनी काय काय साधले?
ठाकरेसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचं की शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या जयंत पाटलांना समर्थन द्यायचं, याबद्दल काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह होते. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये यावरुन थेट दोन गट पडले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नाना पटोलेंनी ठाकरेसेनेच्या बाजूनं कौल दिला. त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला ७ मतांचा कोटा दिला.

काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि, बाळासाहेब थोरात यांनी वेगळी भूमिका घेतली. ते शरद पवार गटाच्या बाजूनं होतं. जयंत पाटील यांना निवडून आणावं, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे ठाकरेंचे उमेदवार असलेले नार्वेकर संकटात सापडले. त्यांच्या पराजयाची शक्यता निर्माण झाली. उद्धवसेनेचे नेते अनिल देसाई, विनायक राऊत, वरुण सरदेसाईंनी वडेट्टीवार आणि थोरात यांना तीव्र विरोध केला. ठाकरेसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे अविश्वास व्यक्त केला.