काँक्रिटीकरण रात्रीच! आयआयटीच्या तज्ज्ञांची महापालिकेला सूचना

प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील दमट वातावरण तसेच वाहतूककोंडी यासारखी आव्हाने पाहता अधिकाधिक कॉंक्रिटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याची सूचना आयआयटीने महापालिकेला केली आहे. दरम्यान, पालिका आयुक्त भूषण गगराणी येत्या काळात मुंबईकरांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्ते उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली आहे.पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण कामांची दर्जोन्नती, कामांमध्ये येणारी आव्हाने, तसेच शंकांचे निरसन यावर चर्चा करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांसाठी पवई येथील आयआयटीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत आयआयटीतील तज्ज्ञांनी विविध प्रकारच्या सूचना आणि शिफारशी केल्या. पालिकेचे आयुक्‍त (प्रकल्प) अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. डॉ. के. व्ही. कृष्णराव, पालिकेचे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक) मनिषकुमार पटेल तसेच अधिकारी व रस्ते अभियंते यावेळी उपस्थित होते. एकूण १५० हून अधिक अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला.
निवडणुकीच्या तोंडावर कांदा उत्पादकांना दिलासा; ९९,१५० मॅट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी
डॉ. कृष्णराव यांनी कॉंक्रिट रस्त्याच्या डिझायनिंगच्या अनुषंगाने तंत्रज्ञानाची माहिती आणि निकष यांची मांडणी केली. तसेच मुंबईतील तापमान आणि वाहनांची वर्दळ याचा विचार करून योग्य तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतील मृदा परिक्षणाची अद्यावत आकडेवारी वापरणे शक्य आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी प्रसरण सांध्यातील आदर्श पद्धती आणि आकडेवारी लक्षात घ्यावी. चांगल्या प्रसरण सांध्यामुळे रस्त्याचे आयुष्यमान वाढ होवू शकते, यासह इतर आवश्यक बाबींचाही त्यांनी उहापोह केला. प्रसरण सांध्यांमधील भेगा, सांध्यातील जास्त अंतर, हलकी आणि जड वाहतूक लक्षात घेता कोणत्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करावी, या विषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी विविध स्वरूपाच्या चाचण्यांचा समावेश करण्यावरही त्यांनी भर दिला. पालिका आयुक्तांनी रस्ते अत्युच्च गुणवत्तेचे असणे, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. म्हणून आयआयटीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.

पॉलिमर काँक्रिटच्या पर्यांयांचा वापर

काँक्रिट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे आणि उपलब्ध उपाययोजना, या विषयावर प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. रस्त्यावर कोणत्या पद्धतीच्या भेगा आहेत, ते पाहून कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्या उपाययोजनाही त्यांनी सांगितल्या. सध्या कॉंक्रिट रस्त्यांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानांचीही त्यांनी माहिती दिली. प्रा. डॉ. के. व्ही. राव यांनी पालिकेने येत्या काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याची गरज बोलून दाखवली.
कुठल्याच सुविधा नाहीत, गावाने टाकला मतदानावर बहिष्कार; बारा वाजेपर्यंत एकही मतदान नाही

दोषदायित्व कालावधी २०हून अधिक वर्षे टिकावा

कोणताही प्रकल्प बांधताना त्यामध्ये गुणवत्ता आणि तांत्रिकदृष्ट्या कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अभियंत्यांनी प्रचंड दक्ष राहणे गरजेचे असते. काँक्रिटीकरण केल्यानंतर त्याचे आयुर्मान १० वर्षांच्या दोषदायित्व कालावधीपुरते मर्यादित न राहता किमान २० पेक्षा अधिक वर्षे टिकून रहावे, अशा दृष्टीने नियोजन करून ही रस्ते बांधणी होणे गरजेचे आहे, असे अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी सांगितले.

‘हिट अँड रन’चा नवा कायदा आला तर देशात ट्रक चालकच शिल्लक राहणार नाहीत; चालकांनी मांडल्या व्यथा

अभियंत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न

– कॉंक्रिट आणि खडी वाहून आणणारी वाहने तसेच रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट यामधील अंतर, मुंबईतील वाहतूक कोंडी, हवामान यासारखी विविध आव्हाने आहेत.

– वाहतूक कोंडीमुळे सिमेंट खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण यासाठी मुंबईतील वातावरण, वाहतूक कोंडी यासारखे घटक कारणीभूत ठरतात.

– रस्त्याची कामे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी तसेच शहरातील मॅनहोल्सचे जाळे ही देखील विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यासाठीची आव्हाने असल्याचा आहेत.

– रस्त्याच्या कामांमध्ये झाडांच्या अडथळ्यांवर काय उपाययोजना करता येतील?

– यावर उद्यान विषयातील तज्ज्ञांकडून वैज्ञानिक पद्धतीवर आधारित उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले.