मुंबई: लोकसभेच्या रिंगणात मुंबईत ठाकरे गटाने आपले चार शिलेदार मैदानात उतरवले होते. आता निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. या मतमोजणीत ठाकरे गटाच्या चारही शिलेदारांनी आघाडी घेतली आहे. हे मविआ आणि ठाकरे गटासाठी आनंदाची बाब आहे. लोकसभेच्या लढतीत राज्यात अनेक जागांवर ठाकरे गटाने उमेदवार उतरवले होते. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. दोन्ही गटांमध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे. १३ पैकी शिवसेना (यूबीटी) सहा ठिकाणी आघाडीवर आहे, तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सातवर आघाडीवर आहे.
दक्षिण मुंबई हा शिवेसनेचा बालेकिल्ला आहे. या संघात शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव त्यांच्यावरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत उभे आहेत. मतमोजणीत अरविंद सावंत आघाडीवर आहे. तर दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनिल देसाई निवडणूक मैदानात आहेत. या मतमोजणीत अनिल देसाई आघाडीवर आहे.

दुसरीकडे उत्तर पश्चिम मुंबईत सेना विरुद्ध सेना असा सामना आहे. शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर रिंगणात आहेत. तर ठाकरे गटाकडून अमोल किर्तीकर निवडणूक मैदानात आहेत. याही मतदारसंघात ठाकरेंचा बोलबाला आहे. तसेच ईशान्य मुंबईत भाजपा विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगत आहे. भाजपाने मिहिर कोटेचा यांना तिकीट दिले आहे. तर मविआकडून संजय दीना पाटील रिंगणात आहे. संजय दीना पाटील हे आघाडीवर आहेत. मुंबईत चार जागेवर ठाकरे गटाने उमेदवार उतरवले आहे. या चारही जागांवर त्यांचा पगडा भारी दिसून येत आहे.