पुणे: पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या बापाला अटक केली आहे. अपघातावेळी कार अल्पवयीन मुलगाच चालवत होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. पण मुलाला वाचवण्यासाठी कुटुंबानं अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर कार चालवत होता असा बनाव रचला. चालकानं गुन्ह्याचा आळ स्वत:वर घ्यावा आणि आरोपी मुलगा सुटावा यासाठी त्याच्या पालकांनी चालकावर दबाव टाकला. त्याचं अपहरण करुन त्याला एका खोलीत डांबलं. त्यानंतर या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे.
पोर्शे कारनं भरधाव वेगात कल्याणीनगरमध्ये दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच शेवट झाला. त्यावेळी कार अल्पवयीन मुलगाच चालवत होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीच्या मित्राची चौकशी केली. कित्येक तास ही चौकशी चालली. अपघाताआधी आरोपीनं मद्यपान केलं होतं. त्यानंतर त्यानंच कार चालवली. अपघात झाला त्यावेळी कारचं स्टेअरिग त्याच्याच हाती होतं, अशी माहिती आरोपीच्या मित्रानं पोलीस चौकशीत दिली आहे. रिपब्लिक वर्ल्डनं पुणे पोलीस दलातील सुत्रांच्या आधारे हे वृत्त दिलं आहे.
अल्पवयीन मुलाच्या मित्राची पुणे क्राईम ब्रांचनं सहा तास चौकशी केली. त्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात अपघाताच्या रात्री घडलेल्या घडामोडींचा उल्लेख आहे. त्यामुळे आरोपीचा पाय खोलात गेला आहे. याआधी आरोपीच्या कुटुंबानं कार ड्रायव्हर चालवत होता असं भासवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चालकावर दबाव टाकण्यात आला. त्यानं ही माहिती न्यायालयात दिल्यानं अगरवाल कुटुंब आणखी अडचणीत सापडलं आहे.

लेकाला वाचवण्यासाठी अगरवालनं ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेला १४ कॉल केले. यानंतर तावरेनं आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिले. त्यानंतर एका दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. या सगळ्यात डॉ. श्रीहरी हळनोरचाही सहभाग होता. दोघांना यासाठी ३ लाख रुपये मिळाले होते. या दोघांना अटक झाली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा, पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे.