महिलेने अर्ध्याहून जास्त आईस्क्रिम खाल्ली होती. पण मध्येच तिला काही तरी गडबड असल्याचे लक्षात येताच तिने बघितले तर आईस्क्रिम मध्ये मानसाच्या अंगठ्याचा तुकडा असल्याचे महिलेले दिसले. या नंतर महिलेने मालाड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी सांगितले की, एका महिलेने ऑनलाईन आईस्क्रिम कोन मागवला होता त्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा मिळाला.
मालाड पश्चिम येथील पेशाने डॉक्टर असलेल्या २६ वर्षीय महिलेने बुधवारी, १२ जूनला एका ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून आईस्क्रिमचा कोन ऑर्डर केला. तिने युम्मो कंपनीचा बटर स्कॉच आईस्क्रिमचा कोन मागवला होता. पण या महिलेस माहित नव्हते की तिला एवढा मोठा धक्का बसेल. महिलेने सांगितले, आईस्क्रिमच्या जवळपास २ सेंटीमीटर आत हा मानवी अंगठ्याचा तुकडा होता.
या प्रकरणी महिलेने मालाड पोलीस ठाण्यात संबंधित कंपनीची तक्रार नोंदवली आहे. मालाड पोलिसांनी युम्मो आईस्क्रिम कंपनीवर गुन्हा दाखल करत आईस्क्रिम तपासणीसाठी पाठवली आहे.